प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

श्रीक्षेत्र माहूर येथे श्री रेणुका देवी संस्थांकडून पूरग्रस्तांना एक कोटी रुपये ची सहायता मुख्यमंत्री सहायता निधी यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्यामार्फत देण्यात आली. तसेच अन्य संस्थाननेही मदत करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. तसेच इतर धार्मिक संस्थान व सामाजिक संस्था यांनी सुद्धा तशीच सहाय्यता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी मंगळवार दि. 30 सप्टें.रोजी दु.1 वा. शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून केले. यावेळी त्यांचे समवेत तहसीलदार अभिजित जगताप, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, मुख्याधिकारी विवेक कांदे यांची उपस्थिती होती.
मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी स. 11 वा. श्रीरेणुकामाता मंदिरात जाऊन सपत्नीक दर्शन घेऊन पूजा अर्चा केली. त्यानंतर यात्रा नियोजन अंतर्गत केलेल्या व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली.त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत लिफ्ट्सह स्कायवॉक,वाहनतळ आणि व्यापारी संकुल हे काम लवकरच पूर्ण केले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टी बाधित नागरिक व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासन युद्ध स्तरावर काम करीत आहे, असे ते म्हणाले.पुरामुळे नदी व नाला काठची जमीन खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्या संदर्भात शासन सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे, असे ते म्हणाले. आभार मानल्यानंतर पत्रकार परिषद संपली.

