सुट्टीच्या दिवशी कार्यालय चालू ठेवण्याच्या आदेशाला बगल

शनिवार रविवारलाही एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नाही
कामाच्या दिवशी गटविकास अधिकारी येत नाहीत सुट्टीच्या दिवशी येतील का ,,?????!
माहूर पंचायत समिती मधील कर्मचारी बेलगाम
माहूर प्रतिनिधी(अनिल माडपेलीवार)
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मेघना कावली यांनी दि 3 रोजी आदेश काढून जिल्हा वार्षिक योजना बैठक आणि व्ही जे एन टी समितीच्या दौऱ्यानिमित्त दौऱ्यात सादर करण्यात येणाऱ्या लेखा जोख्याचा अहवाल तयार करण्यासाठी पंचायत समिती मधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवार आणि रविवार रोजी कार्यालयात उपस्थित राहून सर्व कागदपत्रांची पडताळणी करत अहवाल तयार ठेवण्यासाठी पत्र निर्गमित केले असताना शनिवार दि 4 आणि 5 रोजी एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून अहवाल तयार करताना दिसला नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवली यांच्या आदेशाला अधिकारी कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचा लाजिरवाणा प्रकार घडला आहे
दि 3 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी पत्र काढून सर्व पंचायत समिती जिल्हा नांदेड. येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी कार्यालय चालू ठेवण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाचा संदर्भ देत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-2025/प्र.क्र.7/र.व.का-1/दिनांक 13.01.2025. नुसार आगामी जिल्हा वार्षीक योजना बैठकीचे अनुषंगाने तयारी करणेस्तव व अहवाल सादर करणेसाठी तसंच व्ही जे एन टी कल्याण समितीच्या नियोजीत दौऱ्यांचे अनुषंगाने आस्थापनेविषयी व योजना विषयी माहिती संकलीत करणेस्तव दि 04.10.2025 शनिवार व 05.10.2025 रविवार सुट्टीच्या दिवशी नियमीत कार्यालय सुरु ठेवण्यात यावे. तसेच या विषयी सर्व संबधीत अधिकारी कर्मचारी कार्यालयात हजर राहतील याची दक्षता घ्यावी.
सदर कामी कोणतीही हलगर्जीपणा होणार नाही यांची दक्षता घ्यावी असे कडक शब्दात आदेश निर्माण केले होते
दि 4 आणि 5 रोजी माजी नगरसेवक तथा पत्रकार इलियास बावाणी यांनी आदेशाची प्रत हाती लागल्याने कार्यालयात जाऊन पाहणी केली असता एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हता कार्यालयातील सर्व दरवाजांना कुलूप लावलेले दिसल्याने गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या आदेशाला अधिकारी कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे सिद्ध झाल्याने सदरील बाब मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांना कळाल्याने त्यांनी सदरील प्रकार गंभीर असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली ह्या अधिकारी कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत.

