उपेक्षितांसोबत साजरी होत असलेली प्रकाशाची खरी पर्वणी!

उमरखेड प्रतिनिधी ओंकार सकर्गे
“चलो जलाये खुशियों के दीप वहां,
जहां आज भी अंधेरा है…
इंटरनशनल आयकॉन पुरस्कार व iso मानांकन प्राप्त जिव्हाळा संस्था, उमरखेड च्या वतीने दिपावली च्या पावन पर्वावर “जिव्हाळ्याची गोड दिवाळी” ( एक हात मदतीचा सामाजिक उपक्रम) मागील आठ वर्षा पासून अतिशय गरजवंत, गोर गरीब, ऊसतोड कामगारांच्या व झोपडपटीतील बालकांच्या, गरजू उपेक्षितांसोबत साजरी होणारी जिव्हाळ्याची गोड दिवाळी याही वर्षी दिपावली निमित्य जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष यांच्या आई लताताई रामराव मादावार यांच्या हस्ते उमरखेड येथे बालकांना दिवाळी फराळ व महिलांना किराणा किट वितरण करून जिव्हाळ्याची गोड दिवाळीचा शुभारंभ करण्यात आला. जिव्हाळा संस्था मागील 14 वर्षा पासून अतिशय गरजवंत, गोर गरीब, गरजू उपेक्षितांसाठी अहोरात्र अविरत कार्य करत आहे. त्यामध्ये महिला व बाल सक्षमीकरण, आरोग्य, सिंचन, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामविकास, मदत व सेवा कार्य इत्यादी विषयांवर संपूर्ण महाराष्ट्रतच नव्हे तर देशातील विविध राज्यात संस्था निस्वार्थपणे अविरत कार्य करत आहे या वर्षी पूरग्रस्त हजारो कुटुंबाना संस्थेचे कार्य करून समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमा प्रसंगी जिव्हाळा संस्थे चे संस्थापक अध्यक्ष अतुल लताताई राम मादावार यांनी संस्थे च्या मागील कार्यावर व जिव्हाळ्याची गोड दिवाळी ( एक हात मदतीचा सामाजिक उपक्रम) या उपक्रमा वर प्रकाश टाकला जिव्हाळा संस्था मागील आठ वर्षा पासून हजारो अतिशय गरजवंत, गोर गरीब, पूरग्रस्त, भिक्षेकरी, ऊसतोड कामगारांच्या व झोपडपटीतील बालकांसोबत, गरजू उपेक्षितांसोबत हा उपक्रम फार मोठ्या प्रमाणात दिवाळी चे विविध साहित्य वाटप करून उपेक्षितांसोबत दिवाळी साजरी करीत असते. उपक्रमासाठी स्थानिक चे शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व पत्रकार बांधव इत्यादी साहित्य स्वरुपात सढळ हाताने दर वर्षी मदत करतात त्यामुळे हि जिव्हाळ्याची गोड दिवाळी गरजवंत उपेक्षितांसोबत साजरी होते तसेच त्यांनी सांगितले की आज शुभारंभ प्रासंगिक कार्यक्रमासाठी लोकसहभागातून दिवाळी फराळ व राशन किट ची अमूल्य मदत केली त्यांचे संस्थे च्या वतीने आभार तसेच आवाहन केले कि या उपक्रमासाठी जास्तीत जास्त साहित्य स्वरुपात मदत करावी जेणे करून उपेक्षितां पर्यत आपली अमुल्य मदत पोहोचेल असे ते म्हणाले. या कार्यक्रमा प्रसंगी लता ताई मादावार, जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल लताताई राम मादावार, संस्थे चे सदस्य रामराव मादावार, संस्थे चे सल्लागार सदस्य संगीता अतुल मादावार, स्वयंसेवक दुर्गाजी जंगले, दीपक जंगले, दिनेश चव्हाण, तुळशीराम जंगले आदी उपस्थित होते.

