नांदेड जिल्हा प्रतिनिधी अनिल माडपेलीवार
जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, माहूरच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद आणि पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविल्याबद्दल शाळेने त्यांचे विशेष कौतुक केले. या यशामुळे शाळेसह माहूर परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात गौरवाची भर पडली आहे.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत, भविष्यातही अशीच उत्तुंग यशाची शिखरे सर करून शाळेचे, पालकांचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करण्याचा विश्वास व्यक्त केला.
इयत्ता चौथी चे विद्यार्थी
राठोड आयुष श्रीकांत,
सौदागर समर्या अब्दुल हक,
खोंडे सावी विजय,
लासंते श्रावणी विनोद,
सूर्यवंशी स्वराज गणपत,
मुंडे स्वराली शिवाजी.
इयत्ता आठवीचे विद्यार्थी
लिमजे आराध्या सचिन,
कलाने आनंद रविकिरण,
भगत आराध्या चंद्रकांत,
राठोड अर्णव रणजीत,
मानवर आसित अजय,
आडे धनुश्री नितीन,
झामरे गायत्री लक्ष्मीकांत,
राऊत ईश्वरी निलेश,
तामगाडगे नक्षत्रा सिद्धार्थ,
जायभाये समृद्धी लक्ष्मण,
गावंडे श्रुष्टी अमोल,
जगताप स्वरा गोरख,
केंद्रे विद्यासागर रामकृष्ण.

