पार्किंग हाऊसफुल्ल; टी-पॉइंटवर वाहतुकीची कोंडी
प्रतिनिधी प्रदिप शेरकुरवार
माहूरगडावर शारदीय नवरात्रोत्सवातील अष्टमीच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आई रेणुका मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक माहूरगडावर दाखल होत असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
अष्टमीच्या दिवशी भाविकांची संख्या वाढल्याने टी-पॉइंट परिसरातील पार्किंग हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे टी-पॉइंटवर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली असून, वाहनचालकांना वाहतूक व्यवस्थेतून मार्ग काढावा लागत आहे.
भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाने वाहतूक नियंत्रण व वाहन व्यवस्थापनासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. भाविकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, वाहने निर्धारित पार्किंगमध्येच उभी करावीत आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
अष्टमीच्या निमित्ताने माहूरगडावर भक्तीचा उत्साह शिगेला; भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजला!

