प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी माहुर
श्रीक्षेत्र माहूर प्रसिद्ध शक्तिपीठ असलेल्या माहूरगडावर आज दि. 15 ऑक्टोबर रोजी ललित पंचमीनिमित्त श्री रेणुकामातेची विशेष अलंकार पूजा होणार आहे. दिवसभर भजन गोंधळ नृत्य भरतनाट्यम व शास्त्रीय गायनाने गड दुमदुमणार आहे. सकाळी वैदिक महापूजा व दुर्गा सप्तशती पाठ, तर सायंकाळी नामवंत कलाकारांच्या भक्तिसंगीत मैफली होणार आहेत.
यासोबतच नवरात्रौत्सवानिमित्त श्री रेणुकादेवी संस्थानने भाविकांसाठी थेट गडावरून लाईव्ह दर्शनाची सुविधा सुरू केली असून QR कोड स्कॅन करून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.

