प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
*महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला समता स्वातंत्र्य बंधुता आणि मानवतेचा महान संदेश*
नागपूर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या पावन दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीच दीक्षाभूमी आज कोट्यवधी बहुजनांच्या श्रद्धेचे आणि अस्मितेचे केंद्र बनली आहे.
दीक्षाभूमीवरील भव्य स्तूप हे बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. दरवर्षी १४ ऑक्टोबरला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो बौद्ध अनुयायी नागपूरला येतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर भव्य कार्यक्रम बुद्ध वंदना धम्म देसना खीरदान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
बाबासाहेबांनी याच भूमीवरून विषमता अंधश्रद्धा आणि मनुवादाला नकार देत समता बंधुता करुणा आणि मानवतेचा धम्म स्वीकारला. दीक्षाभूमी ही केवळ तीर्थक्षेत्र नाही तर ती आत्मसन्मानाची आणि सामाजिक क्रांतीची भूमी आहे अशी भावना अनुयायांमध्ये आहे.
या वर्षीही धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झाले होते. परिसरात जय भीम च्या घोषणांनी आणि पंचशीलच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते.

