प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
माहूर महिला सक्षमीकरण सन्मान आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी शक्तिपीठ तुळजापूर ते भक्तिपीठ माहूरगड या मार्गावर नारीशक्ती संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
माहूर शहरातील बालाजी मंगलम सभागृहात सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शालनताई बिडकर यांनी महिलांना संबोधित केले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आरोग्य शिक्षण रोजगार बचत गट लखपती दीदी यासारख्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

