प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
माहूर ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके आणि महागाईचे फटके जनतेला बसत आहेत. पाऊस कमी झाल्याने शेती पिकली नाही विहिरी तलाव कोरडे पडले आहेत. शेतकऱ्यांच्या हातात पिक नाही मजुरांच्या हातात काम नाही त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे.
महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेल खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. गावात रस्ते खराब पाण्याची टंचाई आरोग्य सुविधा नाहीत तरुणांना रोजगार नाही. विकासाची दिशा हरवली आहे.
लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकांचा आवाज उठलाच पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दुष्काळ महागाई व बेरोजगारीवर शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

