नांदेड जिल्हा प्रतिनिधी अनिल माडपेलीवार
नुकत्याच पार पडलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ माहूर चे नवनिर्वाचित संचालक तथा माजी नगराध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे यांचा बहुमताने निवड झाल्यामुळे निकालाच्या दिवशी दिनांक 28 जुलै रोजी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे शहरातील टी पॉइंट (दत्त चौक) येथे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माहूर तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, शहराध्यक्ष कुंदन तीवडकर, सदस्य सुरेश राठोड, सदस्य संजय वडसकर तसेच इतर सदस्य उपस्थित होते. माहूर शहरात येताच फटाक्यांचे आतिशबाजी सह त्यांचे जंगी स्वागत असंख्य कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आले.

