नांदेड जिल्हा प्रतिनिधी अनिल माडपेलीवार
नांदेड जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी रविवार दि. 26 जुलै रोजी पार पडलेल्या मतदानात माहूर येथील बूथ क्रमांक 16 वर तीनही मतदारसंघात शंभर टक्के मतदान झाले.
माहूर शहरातील जि. प. च्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या बूथ क्र. 16 मध्ये अ मतदार संघातून 38 पैकी 38,ब मतदार संघासाठी 1 पैकी 1 व क मतदार संघातून 2 पैकी 2 असे 41 पैकी 41 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक अधिकारी जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांचे मार्गदर्शनात केंद्राध्यक्ष एल. जि. अय्यर यांनी काम पाहिले, त्यांना टी. के. वायबसे, व्ही. यु. राऊत, व्ही. एच. नगराळे व प्रेमदास चव्हाण यांनी मदत केली. मतदान शांततेत पार पडले. यावेळी पो.नि. देविदास चोपडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

