नांदेड जिल्हा प्रतिनिधी अनिल माडपेलीवार
लोकनेते आमदार भीमरावजी केराम यांच्या वाढदिवसानिमित्त १४ ऑगस्ट २०२६ रोजी किनवट येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाले आय हॉस्पिटल, नागपूर, पद्मश्री विकास महात्मे सोशल फाउंडेशन, नागपूर तसेच संदेश भाऊ केराम सोशल फाउंडेशन, किनवट-माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा आरोग्य उपक्रम राबविण्यात येणार आहे.
हे शिबिर सकाळी ८.०० वाजल्यापासून कलावती गार्डन, माहूर रोड, किनवट येथे होणार असून, या शिबिरामध्ये नागरिकांना मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत रेटिना तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिबिरात तपासणीनंतर शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या रुग्णांना १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता नागपूर येथील महात्मे (आय) हॉस्पिटलमध्ये मोफत बससेवेच्या माध्यमातून नेण्यात येणार असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
किनवट-माहूर मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू डोळ्यांच्या रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नावनोंदणीसाठी संपर्क आरोग्य दूत अमन भाऊ कुंडगीर. 7588348548, 9130140218 व 9763767568 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कलावती गार्डन, किनवट येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

