प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे ‘दैनिक गावकरी’ चे तालुका प्रतिनिधी श्री. कार्तिक शंकरराव बेहरे यांना ‘उत्कृष्ट पत्रकारिता सन २०२५-२६ या विशेष सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात आले.नांदेड येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात दैनिक गावकरीचे कार्यकारी संपादक मा. श्री. दिनेशजी हारे सर तसेच जिल्हा प्रतिनिधी मा. श्री. अशोकजी काकांडीकर सर यांच्या शुभहस्ते श्री. कार्तिक बेहरे यांना हे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
श्री. कार्तिक बेहरे यांनी आपल्या बातमीदारीच्या माध्यमातून नेहमीच तळागाळातील लोकांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या समस्या आणि स्थानिक विकासाचे मुद्दे प्रभावीपणे मांडले आहेत. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची आणि निष्पक्ष बातमीदारीची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय मानला जाणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पत्रकारिता हे केवळ माध्यम नसून ते समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे. श्री. कार्तिक बेहरे यांनी दैनिक गावकरीच्या माध्यमातून ही जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडली आहे.
— मा. श्री. दिनेशजी हारे सर (कार्यकारी संपादक दैनिक गावकरी)
या गौरव सोहळ्याप्रसंगी नांदेड जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पत्रकार राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्तिक बेहरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील विविध स्तरातून व पत्रकार बांधवांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

