प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी माहूर
श्री क्षेत्र माहूरगड येथे शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आरोग्य विभागाकडून भाविकांच्या सेवेसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.
आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय माहूर यांच्या वतीने नवरात्रोत्सवापूर्वी आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून भाविकांना मोफत तपासणी मोफत उपचार आणि मोफत औषधी वाटप करण्यात येत आहे.
नवरात्र काळात लाखो भाविक माहूरगडावर येत असल्याने कोणतीही आरोग्याची अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. या आरोग्य शिबिराचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी माहूर यांनी केले आहे.

