प्रतिनिधी रघुनाथ धनवे माहुर
श्री क्षेत्र माहूरगड येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड येथे कार्यरत असलेल्या आरोग्य पथकास भेट देऊन सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. रमेश पाटील गावंडे यांनी पाहणी केली.
यावेळी आरोग्य पथकातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया अभिजीत कदम औषध निर्माण अधिकारी अविनाश रावणगावे आरोग्य सेविका श्रीमती अर्चना गिरी तसेच आरोग्य कर्मचारी मन्सूर खा पठाण इत्यादी उपस्थित होते.
नवरात्र उत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, माहूर जि. नांदेड यांच्या वतीने येथे मोफत तपासणी, मोफत उपचार व मोफत औषधी वाटप केले जात आहे. आरोग्य पथकाच्या कार्याचे डॉ. गावंडे यांनी कौतुक केले.

