नांदेड जिल्हा प्रतिनिधी अनिल माडपेलीवार
चारही DPR मधील असलेल्या लाभार्थ्यांना होणार तीन कोटी 67 लाखाची वाटप मुख्याधिकारी विवेक कांदे तात्काळ मुंबईला रवाना,
या तात्काळ कार्यवाही नतंरच आनंद पाटील तुपदाळे यांच्यासह लाभार्थ्या रेणुकादास बेलखोडे, प्रमिलाबाई जाधव,सुनीता जाधव, विमलबाई जाधव, रेणुकाबाई बाबटकर, सुमनबाई वाठोरकर, यांचे सातव्या दिवशी आमरण उपोषण मागे..
माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायत समोर सुरू असलेले उपोषण सातव्या दिवशी मुख्याधिकारी विवेक कांदे स्वतः मुंबईला रवाना.
3 कोटी 67 लाख रुपये चारही DPR मधील लाभार्थ्यांच्यां खात्यात थेट जमा करणार या अटीवर आमरण उपोषण मागे घेण्यात आले. सहाव्या दिवशी तहसीलदार अभिजित जगताप, मुख्याधिकारी विवेक कांदे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके, यांनी उपोषण मंडपात भेट दिली असता उपोषणार्थी घरकुल लाभार्थी महिलांनी अक्षरश रडूनच व्यथा मांडल्याने घरकुल लाभार्थ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची जाणीव तहसीलदार अभिजीत जगताप, मुख्याधिकारी विवेक कांदे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांना झाल्याने त्यांनाही काही बोलता आले नाही लाभार्थ्यांना पैसे देता येत नसल्याने तहसीलदार मुख्याधिकारी पोलीस निरीक्षक हतबल झाले होते सहाव्या दिवशी म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्यानंतर म्हाडा अधिकाऱ्यांनी ग्रीन सिग्नल दिल्या नतंर मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी मुंबईला जाण्याचे कबूल केल्याने सातव्या दिवशी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी उपोषण मंडपातून दि 4 रोजी म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे केले चारही डीपीआरचे 3 कोटी 67 लाख रुपये तात्काळ देण्याचे त्यांनी कबूल केल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची मंजुरी घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी मुंबईला जाऊन ही रक्कम आणावी या अटीवर उपोषण समाप्त करण्यात आले यासोबतच झालेला भ्रष्टाचार, महामार्गावर गतीअवरोधक तसेच प्रीपेड मीटर परवानगी शिवाय बसवू नये या मागणीलाही अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याने उपोषण सोडण्यात आले यावेळी लाभार्थ्यासह आनंद पाटील तूपदाळे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके, कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड, पोलीस कॉ. गजानन जाधव, पोलीस जमादार गजानन चौधरी, माहूर न.प.च्या उपनगराध्यक्षा सौ. अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, निर्भय व युवा व ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष इलियास बावाणी, जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले, ज्येष्ठ पत्रकार जयकुमार अडकिने, तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, गणेश जाधव, शेख रफिक गाईड, कुंदन तिवडकर, विजय शिंदे, समाधान कांबळे, अंबादास मुकटे, शंकर भालेराव, गोपाल चव्हाण, राम दातीर, शेख मजहर, सुरेंद्र पांडे, शेख अहेमद, शरीफ शेख, विजय सौंदलकर, सादिक शेख, सय्यद जहोरोद्दीन सय्यद अहमद, अनिस शेख, योगेश आराध्ये, मन्नान शेख, अब्दुल सौदागर, यांचे सह पत्रकार नागरीक लाभार्थी उपस्थित होते

