नांदेड जिल्हा प्रतिनिधी (अनिल माडपेलीवार)
(SIR) Special Intensive Revision म्हणजेच मतदार यादीची विशेष आणि सखोल तपासणी म्हणजे मतदार यादीत कोण जिवंत आहे?, कोण स्थलांतरित झालंय?, कोण नवीन मतदार आहे?, कोणाची माहिती चुकीची आहे? याची पडताळणी करणे म्हणजे एस आय आर मोहीम आहे. माहूर शहरांमध्ये असलेल्या लोकसंख्येमध्ये मतदार काही मतदार स्थलांतरित झालेले असतील किंवा काही मतदारांचे दुबार नाव असतील किंवा अठरा वर्ष वरील मतदार यादी मध्ये नोंदणी करायची आहे मग योग्य मतदार यादी तयार करण्यासाठी एस आय आर मोहीम राबविली जाते. माहूर शहरामध्ये होणाऱ्या आगामी नगरपंचायत निवडणुकीमध्ये मतदार यादी मध्ये पारदर्शकता यावी आणि माहूर शहरामध्ये सध्या मोहीम सुरू असून कोणीही दुर्लक्षित न करता सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केलेले आहे. मोहिमेंतर्गत अधिकारी व कर्मचारी घराघरात जाऊन मतदारांची माहिती अध्यायावत करत आहेत या प्रक्रिया प्रत्येक नागरिकाने आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे आणि एसआर मोहिमेदरम्यान मतदारांची वैयक्तिक माहिती अद्ययावत करण्यात येत असून कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये यासाठी नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईक व परिसरातील इतर मतदारांनाही याबाबत जागरूक करावे असे त्यांनी सांगितले.
एस आय आर फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रंगीत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी (असल्यास) ही सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादी अचूक अद्यावत आणि पारदर्शक ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच या मोहिमे बाबत अधिक अधिक जनजागृती करून लोकसहभाग वाढवावा असे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी प्रतिपादन केले.

