नांदेड जिल्हा प्रतिनिधी अनिल माडपेलीवार
स्व. आमदार प्रदीपजी नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५ क्विंटल मसाला भात व व्हेज बिर्याणीचा महाप्रसाद
स्वर्गीय आमदार प्रदीपजी नाईक साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माहूरचे नगराध्यक्ष तथा दानशूर व्यक्तिमत्त्व फिरोज दोसानी यांच्या वतीने माहूर येथे भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे ५ क्विंटल मसाला भात व व्हेज बिर्याणीचा महाप्रसाद हजारो भाविकांना वाटप करण्यात आला.
माहूर नगरीत येणाऱ्या भाविकांच्या सेवेला प्राधान्य देत नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे सातत्याने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवत असतात. नगराध्यक्ष पदाला साजेसे पालकत्वाचे नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी माहूर शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नवरात्र उत्सव, दत्त जयंती, ईद-ए-मिलादुन्नबी, गणेश विसर्जन, सरकार सोना पीर बाबा उरूस तसेच शहरातील विविध यात्रा व धार्मिक उत्सवांच्या काळात भाविकांसाठी पिण्याचे पाणी, महाप्रसाद, उपवासासाठी खिचडी यांसह विविध सेवा उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविले जातात.
माहूरच्या विविध धार्मिक यात्रांना लाखो भाविकांची उपस्थिती असते. अशा वेळी भाविकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी महाप्रसादाचे स्टॉल उभारले जातात. मात्र, नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे केवळ उपक्रमाचे आयोजन करून थांबत नाहीत, तर स्वतः उपस्थित राहून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करतात. त्यांच्या या आपुलकीच्या आणि सेवाभावी वृत्तीचे भाविकांकडून विशेष कौतुक होत आहे.
“भाविकांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचे सेवाकार्य अविरत सुरू आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे माहूरच्या धार्मिक आणि सामाजिक परंपरेला सेवाभावी कार्याची जोड मिळत असून, त्यांच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष नानाभाऊ लाड, नगरपालिका अकाउंटंट मरेवाड साहेब, ओ.एस. गजलवाड साहेब, नगरसेविका प्रतिनिधी आकाश कांबळे, अफसर अली, विशाल ढोरे, सुमित खडसे, पत्रकार गजानन भारती, बालाजी कोंडे, राजू ठाकूर, निलेश बनसोडे, रफिक भाई, गणेश जाधव, सुनील आडे, विजय शिंदे आदी उपस्थित होते.

