यवतमाळ प्रतिनिधी अरुण देशमुख
अनंत कुमार सूर्यकार
मंगरूळ :- ग्रामीण.
स्थानिक
अल्पभूधारक शेतकरी मनोज मधुकर वलके वय ४५ वर्षे या तरूण शेतक-याने दि २० जुलै रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्या खोलीमध्ये आत्महत्या केली तेव्हा त्या खोलीत अंधार होता . घरच्या लोकांना वाटले की , मनोज गावात कुठेतरी बसून असेल. जेव्हा बाजूच्या खोलीत काहीतरी पडायचा आवाज आला . लगेचच घरचे लोक खोलीत पाहतात तर मनोजने गळफास घेतलेला होता. काही कळायच्या आतच मनोजला मृत्यूने कवटाळले होते . विधवा आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा अशी पूर्ण प्रापंचिक जबाबदारी एकट्या मनोजवरच होती . दरवर्षी शेती साथ देत नाही तर दुसरीकडे मुलांच्या शिक्षणाचा भार तसेच काही लोकांकडून उसणवारीने पैसे घेतलेले होते . यावर्षीही पहिली पेरणी केली असता बियाणे उगवलेच नाही. महागडे बियाणे मातिमोल झाले. त्यामुळे मनोजने डिप्रेशनमध्ये जाऊन हे टोकाचे पाऊल उचलले असावे. अशी गावक-यांमध्ये चर्चा आहे. यवतमाळ तहसीलचे तहसीलदार डॉ योगेश देशमुख, मंडळ अधिकारी जगदीश जयस्वाल, तलाठी धीरज पत्रे यांनी कुटुंबाची सांत्वना करून शासनातर्फे मदतीची हमी दिली. यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार प्रवीण मानकर, हेड कॉन्स्टेबल नीरज पातुरकर व पोलीस शिपाई तुळशी जाधव यांनी मृत शरीराचा पंचनामाआहेत. करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठवले . पुढील तपास हेड कॉन्स्टेबल नीरज पातुरकर करीत आहेत.

