अध्यक्षपदी संदीप कोमावार, तर उपाध्यक्षपदी शेख मुजम्मील यांची निवड
**हिमायतनगर :** ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्याची हिमायतनगर तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. संघटनेच्या **अध्यक्षपदी संदीप कोमावार** यांची, तर **उपाध्यक्षपदी शेख मुजम्मील** यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थापक अध्यक्ष **श्री. गजानन वाघमारे सर**, राज्य समन्वयक **श्री. अमोल कोमावार सर** तसेच विदर्भ-मराठवाडा समन्वयक **श्री. गोपाल गौरवाड सर** यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारणीत **कोषाध्यक्षपदी लक्ष्मण शन्नेवाड**, **सचिवपदी वरिष्ठ पत्रकार सय्यद मन्नान भाई ** यांची निवड करण्यात आली आहे. तसेच **सदस्यपदी शेख खय्युम कुरेशी आणि अझीम हिंदुस्थानी** यांची निवड करण्यात आली.
ग्रामीण भागातील पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकारांचे हक्क व प्रश्न तसेच ग्रामीण स्तरावरील जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवनियुक्त तालुका कार्यकारणीचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबविले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

