तालुका प्रतिनिधी शंकर पंधरे राळेगाव
दहेगाव येथिल युवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना दिले निवेदन
राळेगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ते दहेगाव मंगी हा सिमेंट रोड मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झाला सदर रोडचे काम एक वर्षांपासून सुरू आहे परंतु सिमेंट रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दहेगाव येथील युवकांच्या व ग्रामस्थांच्या निदर्शनात आले तर आज दि 28 /9/2026 रोजी सोमवार ला विशाल खत्री मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना दहेगाव येथील युवकांनी निवेदन दिले
सदर निवेदन राष्ट्रीय महामार्ग ते दहेगाव मंगी सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे मात्र प्रत्यक्ष पाहणी वेळी कामे निकृष्ट दर्जाचे असल्याने निदर्शनात आले तसेच तांत्रिक आवश्यक गुणवत्तेच्या निकषा प्रमाणे काम होत नाही आहे त्यामुळे दहेगाव ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे या कामात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसत आहे हा सिमेंट रस्ता दहेगाव वासियासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे रुग्णवाहिका बस महिला पुरुष जेष्ठ नागरिक शेतकरी मजूर वर्गासाठी व विद्यार्थी यांच्यासाठी जाण्यासाठी एकमेव पर्याय मार्ग आहे परंतु रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तरीपण संबंधित कंत्राटदाराने कोणतीही पर्याय व्यवस्था केली नाही त्यामुळे दहेगाव येथील नागरिकाची गैरसोय होत आहे कधी एखादी अपघात होईल याची शक्यता नाकारता येत नाही पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी खूप बिकट परिस्थिती असते आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शासनाचा निधी वाया जाईल रस्ता लवकर खराब होऊन दहेगाव वासियांना याचा त्रास सहन करावा लागेल त्यामुळे संबंधित प्रकरणाची निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी चौकशी पूर्ण होईपर्यंत सुरू असलेल्या रस्त्याचे काम थांबविण्यात यावे तसेच संबंधित कंत्राटदार अभियंता सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी भविष्यात निकृष्ट दर्जाचे काम करणार नाही तात्काळ वरील विषय मार्गी लावावा अन्यथा दहेगाव ग्रामस्थ कडून आंदोलन करण्यात येईल नाहीतर 15 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल असा इशारा देण्यात आला निवेदन देते वेळी, स्वप्नील काळे, प्रवीण लोडे, भारत काळे, अभिषेक जिवतोडे, युवराज चटकी उपस्थित होते

