प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
माहूर नांदेड माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येथे पूर्वी नियमित सुरु असलेली बस सेवा रस्त्याच्या कामामुळे खंडित झाली होती. रस्त्याचे काम पूर्ण होऊन ५ महिने उलटले तरी अद्याप बस सेवा सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रमेश संतोषराव गावंडे पाटील यांनी या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रतापजी सरनाईक यांना दि. २४/०९/२०२६ रोजी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वाई बाजार हे मोठे बाजारपेठ असून परिसरातील जवळपास ३५ ते ४० खेड्यांचा या गावाशी दैनंदिन संपर्क आहे. बस सेवा बंद असल्याने गावातील २ कि.मी. परिसरातील प्रवाशांना जेष्ठ नागरिकांना दिव्यांग व्यक्तींना रुग्ण व गरोदर महिला शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व्यापारी वर्गास आणि शेतमजुरांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
वारंवार सांगून व पाठपुरावा करूनही बस सेवा पूर्ववत सुरु झाली नसल्याने आता नागरिकांमध्ये संताप आहे.
यामुळे डॉ. गावंडे यांनी वाई बाजार ते माहूर मार्गावर बस सेवा नियमित व पूर्ववत सुरु ठेवावी अशी मागणी केली आहे.
सोबत माहूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ठरावही जोडले आहेत.

