प्रतिनिधी प्रदीप शेरकुरवार माहूर
माहूर नगरपंचायत कार्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष फिरोज सर दोसाणी साहेब तसेच उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सह.कार्यालय अधिक्षक संदीप सर गजेलवाड, लेखापाल विशाल मरेवार यांच्यासह नगर पंचायत कर्मचारीअधिकारी, व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महात्मा गांधी यांनी दिलेला सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून शहराच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

